मलकापूर :- इव्हॉनिथ स्टील पुरस्कृत ममता HIMCच्या पुढाकाराने दिनांक 23 जुलै 2026 रोजी मलकापूर येथील ममता HIMC कार्यालयात उच्च-जोखीम गर्भधारणा (High Risk Pregnancy), प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) व प्रसूतीनंतरची काळजी (PNC) या विषयांवर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणात माकनेर , बाहपुरा, पानेरा , बेलाड व वाघुळ या पाच गावांतील आशा सेविका, ANM, CHO व वैद्यकीय अधिकारी (MO) यांनी सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणामध्ये उच्च-जोखीम गर्भवतींची वेळेवर ओळख, आवश्यक आरोग्य तपासण्या, जोखमीच्या मातांचे योग्य व्यवस्थापन, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी तसेच माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सहभागींच्या शंकांचे निरसन करून क्षेत्रात प्रभावीपणे काम करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.
प्रशिक्षणादरम्यान लीना उप्पल मॅडम, पिंकी निमजे मॅडम व संगीता मॅडम यांनी विषयाचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच सुरेखा जैन मॅडम(THO), इव्हॉनिथ स्टीलचे व्यवस्थापक प्रफुल भोपळे सर, कुणाल सर उपस्थित होते . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , रश्मी होले व विश्वजीत भुजाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रशिक्षणामुळे क्षेत्रातील गर्भवती माता व नवजात बालकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित व वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.