दुचाकीच्या पॉकेटमधून ३५ हजारांचा ऐवज लंपास एसबीआय शाखेसमोरची घटना; ३० हजारांची रोकड, मोबाईल व कागदपत्रे चोरीला

जळगाव जामोद : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेसमोर उभी असलेल्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीवरील पॉकेटमध्ये ठेवलेली ३० हजार रुपयांची रोकड, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे ३५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना सोमवारी (२१ जुलै) दुपारी घडली. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनापाणी (ता. जळगाव जामोद) येथील विकास माज्या जमरा (वय ३२) यांनी एसबीआय शाखेतून ३० हजार रुपये काढले. त्यांनी ती रक्कम, पासबुक, आधार कार्ड आणि सुमारे ५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल कापडी पिशवीत ठेवून ती दुचाकीच्या पेट्रोल टाकीवरील पॉकेटमध्ये ठेवली. त्यानंतर ते जवळील चहाच्या टपरीवर गेले असता, अज्ञात चोरट्याने संधी साधून पिशवीसह संपूर्ण ऐवज चोरून नेला.
या घटनेप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!