Headlines

साखरपुड्यानंतर दिला विश्वासघात; लग्नाचे आश्वासन देऊन संबंध, व्यापाऱ्यावर गुन्हा

देऊळगाव राजा : लग्नाचे आश्वासन देत साखरपुडा करून एका पीडित महिलेशी चार वर्षे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा येथील एका व्यापारी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील एका ४० वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून केतन पदमकुमार गिरणीवाले (रा. जुना जालना रोड, देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपीने पीडित महिलेला विवाहाचे आश्वासन देत तिच्यासोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर जून २०२२ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र, विवाह करण्याचे आश्वासन पूर्ण न करता आरोपीने दुसऱ्याच युवतीशी विवाह केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
या प्रकरणी २० जून रोजी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!