Headlines

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचे शोषण; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : तालुक्यातील दाताळा परिसरात अल्पवयीन मुलीवर धमकावून वारंवार अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली असून, पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाताळा येथील १६ वर्षीय मुलगी शिक्षण घेत असून, घराच्या बांधकामाच्या कामादरम्यान तिची मुख्य आरोपी तोफीख शाह अताउल्ला शाह उर्फ शाहरुख याच्याशी ओळख झाली होती. यानंतर आरोपीने संधी साधून पीडितेला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित प्रकाराबाबत कुणाला माहिती दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनुसार, या प्रकरणात मुज्जु शाह साबीर शाह व शाकीर शाह यांनीही मुख्य आरोपीला मदत केल्याचा आरोप आहे. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत पीडितेवर वारंवार अत्याचार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तोफीख शाह अताउल्ला शाह उर्फ शाहरुख, मुज्जु शाह साबीर शाह आणि शाकीर शाह यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!