Headlines

रेल्वे रुळावर अज्ञात इसमाचा मृतदेह; अपघाताची शक्यता

मलकापूर : मलकापूर-बोदवड रेल्वेमार्गावर खामखेड स्थानकाजवळ एका ३० वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर ते बोदवड दरम्यान खामखेड रेल्वे स्थानक परिसरातील ४८९/१०-१२ या रेल्वे पटरीवर १० मे रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी संजय भगवान भोरकडे (ट्रॅकमन), रा. हनुमान नगर, मलकापूर यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग क्रमांक २५/२०२६ कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद केली आहे. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास सपोनि दिलीप राठोड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!