Headlines

डोणगावात कोठार फोडून ३० क्विंटल हळदीच्या बेण्याची चोरी; शेतकऱ्यांमध्ये भीती!

डोणगाव :- येथील एका कोठाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३० क्विंटल हळदीच्या बेण्यावर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल विश्वनाथ भुतेकर (वय ४४, रा. डोणगाव) यांनी पेरणीसाठी विकत घेतलेले हळदीचे बेणे गावातील राजेश रमेश सावजी यांच्या कोठारात साठवून ठेवले होते. ४ मे रोजी सायंकाळी कोठार बंद करण्यात आले होते. मात्र, ५ मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत बेण्याची चोरी केली. प्रति क्विंटल सुमारे ३ हजार रुपये दराने ३० क्विंटल हळद लंपास करण्यात आली. या घटनेप्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अरुण सानप हे ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. दरम्यान, शेतीसाठी साठवलेले बेणे चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!