Headlines

शेतातील सोलरच्या नऊ प्लेटा फोडल्या, गुन्हा दाखल; मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा :- तालुक्यातील मुर्ती शिवारात अज्ञात व्यक्तीने शेतातील सोलर यंत्रणेची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात नऊ सोलर प्लेटा फोडण्यात आल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
रोहिनखेड येथील शेतकरी देविदास भिकाप्पा चांदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुर्ती शिवारातील शेतात उभारलेल्या सोलर प्लांटमधील प्लेटा नुकसानग्रस्त अवस्थेत आढळल्या. २५ मे रोजी सकाळी सुमारे साडेसात वाजता ते शेतात गेले असता हा प्रकार लक्षात आला. या घटनेत अंदाजे १८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!