बसस्थानकात कर्मचाऱ्यावर हल्ला; टॅक्सीचालकावर गुन्हा, देऊळगाव राजा येथील घटना!

देऊळगाव राजा :- शहरातील बसस्थानक परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी टॅक्सीचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर प्रल्हाद खरात (वय ५४, रा. बोराखेडी बावरा) हे बसस्थानकात कर्तव्यावर असताना संबंधित आरोपी अक्षय तोडे (रा. सिंदखेड राजा) हा प्रवासी वाहतूक करणारे वाहन बसस्थानकात आणून प्रवासी घेत होता. यावेळी खरात यांनी त्यास थांबवून नियमांची माहिती दिली. याचा राग मनात धरून आरोपीने थेट चौकशी कक्षात जाऊन खरात यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!