Headlines

बाजार समितीच्या कर्मचाऱ्याला कार्यालयात मारहाण; कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

देऊळगाव राजा : कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकरी जाण्यास तुम्हीच जबाबदार आहात, असा आरोप करीत एका व्यक्तीने बाजार समितीच्या कर्मचाऱ्याला कार्यालयात मारहाण केल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर सीताराम म्हस्के (वय ५६, रा. चिखली) हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात काम करीत असताना गणेश सीताराम म्हस्के (रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) तेथे आला. बाजार समितीतील आपली नोकरी जाण्यास तुम्ही जबाबदार असल्याचे म्हणत त्याने किशोर म्हस्के यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांना कार्यालयात मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार आहे. किशोर म्हस्के यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी गणेश म्हस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *