रेल्वेसमोर उडी घेऊन अज्ञात वृद्ध इसमाची आत्महत्या; बिस्वा ब्रिज – मलकापूर ची घटना

मलकापूर : बिस्वा ब्रिज ते मलकापूर रेल्वे स्टेशन दरम्यान अप लाईनवर एका अज्ञात वृद्ध इसमाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत ट्रॅकमॅन निलेश राजाराम ढोले (युनिट क्र. १, वडोदा स्टेशन) यांनी दिलेल्या मेमोवरून ही नोंद करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.५० वाजण्यापूर्वी बिस्वा ब्रिज ते मलकापूर स्टेशन दरम्यान अप लाईनवर एका अज्ञात व्यक्तीने गाडी क्र. MFSG समोर उडी घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात उप स्टेशन प्रबंधक कार्यालय, मलकापूर येथून मिळालेल्या मेमोच्या आधारे मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मर्ग क्र. १३/२०२६ कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्ती अंदाजे ६५ ते ७० वर्षे वयाचा अनोळखी पुरुष असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास बिट सपोउपनि उल्हास मुके करीत आहेत. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून परिसरात चौकशी सुरू असून संबंधित व्यक्तीची माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!