भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी! चिखली येथील घटना

 

चिखली : – शहरातील देऊळगाव राजा–मीरा रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका युवकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सरंबा (ता. देऊळगाव राजा) येथील रहिवासी स्वप्निल दिनकर चेके (वय २७) हा मित्रासोबत दुचाकीने गावाकडे जात असताना मीरा लॉन्ससमोर समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातात स्वप्निल गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातातील दुसरा दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातस्थळी नागरिकांनी तातडीने मदतकार्य केले. दरम्यान, शहरात वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!