Headlines

घराकडे परतताना काळाने झडप घातली; शाखाधिकारी अपघातात ठार!

बुलढाणा : अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी विजय माधव आराख (वय ५७, रा. मिलिंदनगर, बुलढाणा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी डासाळा गावाजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, विजय आराख हे उदयनगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. शनिवारी नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज पूर्ण करून ते आपल्या एमएच २८ डब्ल्यू ६३०५ क्रमांकाच्या दुचाकीने घरी परतत होते. दरम्यान, डासाळा परिसरातील पैठणे यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, अज्ञात वाहनचालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!