Headlines

तक्रारीचा राग मनात ठेवून बाप-लेकावर प्राणघातक हल्ला; एक जण गंभीर, सात जणांवर गुन्हा दाखल!

 

*( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा )*
बुलढाणा: शासकीय जागेवरील प्राचीन बारव तोडून बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार केल्याच्या रागातून सात जणांनी बाप-लेकावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना २५ मार्च रोजी लोणार शहरातील जमजम कॉलनी परिसरात घडली. मोहंमद रिजवान यांनी प्राचीन बारव तोडून बांधकाम केल्याची तक्रार नगरपरिषदेकडे केली होती. या तक्रारीचा राग धरून नूर मोहंमद खान ताजमीर खान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोहंमद रिजवान, त्याचे वडील मोहंमद नासेर आणि भाऊ मोहंमद सद्दाम हुसेन यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!