Headlines

घरात कोणी नसताना 15 वर्षाच्या तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, बुलढाणा शहरातील घटना!

बुलडाणा – स्थानिक प्रबोधन विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या नववीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भाग्यश्री वसंत बाहेकर (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. सोमवारी, ३ मार्च रोजी घरी कोणी नसताना तिने बेडरूममध्ये रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतला. संध्याकाळी घरच्यांनी परतल्यानंतर तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी पुस्तक आणि चाकू देखील सापडले आहेत. भाग्यश्रीचा परिवार धाड नाका सागवान परिसरात राहतो. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!