Headlines

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र लांबविले.. बुलढाणा बस स्थानकावरील घटना!

 

बुलढाणा: शहरातील बसस्थानकावर दुपारच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती सुधाकर कांबळे (वय ५१, रा. फॉरेस्ट कॉलनी, बुलढाणा) या शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी आपल्या मुलाकडे संभाजीनगर येथे जाण्यासाठी बुलढाणा बसस्थानकावर आल्या होत्या. दुपारी सुमारे ३.३० वाजता फलाट क्रमांक १ वर उभ्या असताना बुलढाणा-पैठण एस.टी. (वाहन क्रमांक M-40 N-9775) आली. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे २४,००० रुपये किमतीचे मंगळसूत्र कुणीतरी चोरट्याने खेचून लंपास केले. गर्दीमुळे चोरीची घटना लगेच लक्षात आली नाही. मात्र, बसमध्ये चढल्यानंतर गळ्यातील मंगळसूत्र दिसून न आल्याने त्या बसमधून खाली उतरल्या आणि शोध घेतला. मात्र, त्यांना मंगळसूत्र सापडले नाही. याप्रकरणी ज्योती कांबळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार दत्तात्रय नागरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!