Headlines

पुलावरून लक्झरी बस कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही, बाळापूर-पारस फाट्यावरील भिकुनखेड पुलावरील घटना!

 

खामगाव : अकोला जिल्ह्यात बाळापूर-पारस फाटादरम्यान असलेल्या भिकुनखेड पुलावरून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता खासगी लक्झरी बस खाली कोसळली. या बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.अयोध्येहून दर्शन घेऊन परतणारी लक्झरी बस (क्रमांक एमएच ३७ बी ४९९९) भुसावळमार्गे वाशिमकडे जात होती. भिकुनखेड पुलावर कठडे नसल्यामुळे बस थेट नदीपात्रात कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, त्यांच्या पथकाने व ग्रामस्थांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. भिकुनखेड पुलावर कठडे नसल्यामुळे यापूर्वीही अपघात झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलावर कठडे बसवण्याची मागणी वारंवार केली जात आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!