जळगाव जामोद :- खाजगी शिकवणी क्लास घेणाऱ्या शिक्षकाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अंगावरून वाईट उद्देशाने हात फिरवून विनयभंग केल्याची घटना काल दि. 26 रोजी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने जळगाव जामोद येथील एका इंग्लिश स्पिकिंग क्लास मध्ये शिकवणी क्लास लावली होती. पीडित मुलगी नेहमीप्रमाणे काल शिकवणी क्लासला गेली होती. शिकवणी खोलीत गेल्यानंतर आरोपी शिक्षक किशोर पाटील याने तुला काही प्रॉब्लेम आहे का? असे म्हणत तरुणीच्या अंगावरून वाईट उद्देशाने हात फिरवला असे दिलेल्या तक्रारी नमूद केले आहे. यादरम्यान तरुणीने घरी येऊन घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली आहे. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत आहे.