भरवस्तीतून मोटारसायकल चोरी; सीसीटीव्हीत कैद आरोपी, बुलढाण्याची घटना!
बुलढाणा : शहरातील विदर्भ हाउसींग सोसायटी परिसरात घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. फिर्यादी आसीफ खान अयुब खान पठाण (वय ३६, रा. विदर्भ हाउसींग सोसायटी, बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी २१ एप्रिल…
