चिखली :- पोलिस स्टेशनच्या होमगार्ड युनिटमध्ये कार्यरत असलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ एप्रिल रोजी दुपारी घडली. आत्माराम उत्तम वखरे (रा. सवणा) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम वखरे हे दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास टपाल घेऊन दुचाकीने चिखलीहून बुलढाण्याकडे जात होते. दरम्यान, केळवदसमोरील शेताजवळ ते थांबले असता बुलढाण्याकडून येणाऱ्या एमएच-२८-बीबी-७३६० क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील प्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात हलविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.