Headlines

एकाच अपघातात जिवलग मित्रांचा अंत; एकाच वेळी निघाल्या अंत्ययात्रा, डोणगाव झाले सुन्न

डोणगाव : एकत्र फिरणारे, एकत्र हसणारे आणि कायम एकमेकांच्या सोबत असलेले दोन जिवलग मित्र नियतीच्या एका भीषण अपघाताने कायमचे दूर झाले. मेहकरकडे दुचाकीने निघालेल्या डोणगावातील दोन तरुणांचा कंटेनरच्या जोरदार धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. २) रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास जालना बायपास ते पुलगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी वर घडली. शेख साहिल…

Read More

चाकू हल्ल्याने खामगावात खळबळ; जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

खामगाव : जुन्या वादाचा राग मनात धरून एका २९ वर्षीय तरुणाला हॉटेलसमोर बोलावून चाकूने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना खामगावातील भुसावळ चौक परिसरात घडली. चाकूचा वार अडविताना तरुणाच्या दोन्ही हातांसह कानाला दुखापत झाली असून, या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारत प्रकाश सोनी (वय २९) यांना…

Read More

मलकापुरातील ज्वेलर्स फोडले; मात्र दागिने सुरक्षित! चोरट्यांच्या हाती केवळ १,५०० रुपयांची रोकड

दुसरबीड : तब्बल पाच चोरट्यांनी मध्यरात्री कटरच्या सहाय्याने सराफा दुकानाचे शटर व कुलूप तोडून धाडसी चोरी केली. मात्र दुकानातील मौल्यवान दागिन्यांपर्यंत पोहोचण्यात त्यांना अपयश आल्याने चोरट्यांच्या हाती केवळ गल्ल्यातील सुमारे १ हजार ५०० रुपयांची रोकड लागली. ही घटना ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री मलकापूर पांगरा येथे घडली असून, चोरीसाठी वापरलेले चारचाकी वाहनही चोरट्यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या…

Read More

समृद्धीवर पुन्हा अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्ती ठार

डोणगाव : समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक २७१ जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी भीषण होती की मृतदेहाची अवस्था विद्रूप झाली असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती डायल ११२ वर मिळताच डोणगाव पोलिस, महामार्ग पोलिस, रुग्णवाहिका व वैद्यकीय…

Read More

मलकापूरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष; रशियातील शिवरायांच्या पोवाड्याचा देखावा ठरला विशेष आकर्षण

मलकापूर :- साहित्यसम्राट व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मलकापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व समाजघटकांसह महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केल्याचा साकारण्यात आलेला देखावा विशेष…

Read More

भाडगणी गावात चोरट्यांची भीती वाढली; सुरक्षा उपाययोजनांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

भाडगणी : गावात चोरीच्या घटनांची भीती वाढत असताना ग्रामपंचायतीच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील अनेक भागांमध्ये अद्याप पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे चोरट्यांना अंधाराचा फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गावात CCTV कॅमेरे बसविण्याची मागणी होत असतानाच अनेक ठिकाणी साधे पथदिवेही उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे…

Read More

पुर्णा नदीपात्रात ४८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला; मलकापूर शहर पोलिसांत मर्ग दाखल

मलकापूर : धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात मलकापूर येथील ४८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पाण्यात बुडाल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले असून, या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कक्षसेविका अलका एकनाथ काळे यांनी दिलेल्या माहितीवरून, २९ ऑगस्ट…

Read More

हॉटेलमध्ये जेवल्यानंतर ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, मदीना हॉटेलची तपासणी करून अन्नाचे नमुने घेतले; त्रुटी आढळल्याने हॉटेल बंद करण्याचे निर्देश

मलकापूर : शहरातील वल्लीचौक परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर ६५ वर्षीय इसमाची प्रकृती अचानक बिघडून मृत्यू झाल्याच्या तक्रारीने खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संबंधित हॉटेलची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याने हॉटेल मालकाला नोटीस बजावून हॉटेल बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती…

Read More

मिलसमोरील रस्त्याकडेला रंगला जुगार; स्थानिक गुन्हे शाखेची धाड, सात जणांवर गुन्हा

खामगाव : एमआयडीसी परिसरातील राठी ऑईल मिलसमोरील रस्त्याच्या कडेला खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि ५२ ताशपत्ते असा एकूण ४५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सातही जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल…

Read More

बुलडाणा जिल्ह्यात चोरट्यांसह गुन्हेगारी वाढली; ग्रामीण भागात दहशत, “आपलं गाव आपली जबाबदारी”तून तरुणांचा रात्री पाहारा

मलकापूर :- बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. रोजच कुठे ना कुठे चोरी उघडकीस येत आहे. नांदुरा तालुक्यातील काटी येथे दरोड्यात एका व्यक्तीचा खून आणि माकनेर येथे महिलेवर हल्ला, खामगाव-बुट्टी येथे चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना घडल्या आहेत. मलकापूरमध्ये चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत….

Read More
error: Content is protected !!