पावसाच्या लहरीपणामुळे पिके धोक्यात; मलकापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची शिवसेना (उबाठा)ची मागणी
मलकापूर : अपुरा पाऊस, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि आता पुन्हा पावसाने दिलेली दीर्घ उघडीप यामुळे मलकापूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मलकापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जून महिन्यात पेरणीच्या काळात…
