Headlines

दारू तस्करीप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल ₹99,160 किमतीचा मुद्देमाल जप्त

 

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

मलकापूर:- मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दारू तस्करीवर धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, तब्बल ₹99,160 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाही 14 जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता सुमारास दुधगाव शिवारात केली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की ग्राम दूधलगाव शिवार येथे नाकाबंदी करून पोलिसांनी ही कारवाई केली. ठाणेदार संदीप काळे यांच्या आदेशानुसार पी.एस.आय. राठोड, पोहेका दिलीप तडवी, पोका संदिप राखोंडे आणि शेख युसुफ यांनी ही कारवाही केली. या मध्ये आरोपी मोहन सुनिल मुंढे (वय 23, रा. सिंदखेड लपाली, ता. मोताळा), अर्जुन निवृत्ती पाटील (वय 28, रा. भानगुरा, ता. मुक्ताईनगर, ह.मु. लिहा, ता. मोताळा) यांच्या कडून रॉयल स्टॅग 180 मि.लि. बाटल्या: 60 नग, ₹11,400, रॉयल स्टॅग 90 मि.लि. बाटल्या: 124 नग, ₹12,400, मॅकडॉवेल्स 180 मि.लि. बाटल्या: 96 नग, ₹15,360, हिरो फॅशन दुचाकी: क्रमांक MH-28-AF-6762, ₹60,000 असा एकूण ₹99,160 माल जप्त केला आहे. तस्करीविरोधातील ही यशस्वी कारवाई ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकरणाचा तपास पोहेका दिलीप तडवी करत असून आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *