Headlines

पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; खामगावात कौटुंबिक वादातून थरारक प्रकार

खामगाव : कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरातील सुटाळा खुर्द परिसरात घडली असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किशोर काशीराम चोपडे (वय ४९, रा. सुटाळपुरा, खामगाव) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पांडुरंग नारायण बोचरे, अजय पांडुरंग बोचरे, गोपाल…

Read More

रस्ता अडवण्याचा जाब विचारल्याचा राग; तरुणीस बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा

खामगाव : शहरातील चांदमारी घरकुल परिसरात सार्वजनिक रस्ता अडवून ठेवण्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून १९ वर्षीय तरुणीस चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुनम सखाराम इंगळे (वय १९) या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मे रोजी रात्री…

Read More

गर्दीचा फायदा घेत बसस्थानकात वृद्धाला लूटले; एक लाख रुपयांचा ऐवज लंपास; खामगाव येथील घटना

खामगाव : शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी असतानाच चोरट्यांनी डोळ्यादेखत हातसफाई दाखवत ८२ वर्षीय वृद्धाच्या खिशातील सुमारे एक लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना ४ मे रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत भगवान देवराव डुबल (वय ८२, रा. शिवाजी नगर, जुना फैल, खामगाव) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, डुबल…

Read More

रेल्वे रुळावर आलेल्या गायीला वेगाने येणाऱ्या रेल्वेगाडीने जोरदार दिली धडक; धडकेत गाय हवेत उडून बाजूलाच खेळत असलेल्या चिमुकल्याच्या अंगावर कोसळली; चुमुकल्याचा मृत्यू

खामगाव : वाडी परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत रेल्वेगाडीच्या धडकेत उडालेली गाय थेट ११ वर्षीय बालकाच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात गायीचाही मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाडी येथील जय माता दी नगर परिसरातील रहिवासी शंकर वावटूळकर…

Read More

तरुणाचे टोकाचे पाऊल; घाटपुरीत गळफास घेऊन आत्महत्या

खामगाव : तालुक्यातील घाटपुरी जुनेगाव येथे २२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत युवकाचे नाव करण संजय सरडे (वय २२, रा. घाटपुरी जुनेगाव, ता. खामगाव) असे आहे. याप्रकरणी त्यांचे वडील विजय बाबुराव सरडे (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ एप्रिल रोजी…

Read More

ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना!

खामगाव : तालुक्यातील निळेगाव फाटा परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद रामकृष्ण वाकोडे (वय ५५, रा. आबाद नगर, ता. बाळापूर, जि. अकोला) हे ट्रॅक्टरने जात असताना निळेगाव फाटा, रामनगर शिवार परिसरात अपघात…

Read More

मध्यरात्री घरफोडी; दागिने व रोकड असा २.११ लाखांचा ऐवज लंपास! पिंप्रीगवळी येथील घटना

खामगाव :- तालुक्यातील पिंप्री गवळी येथे चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करत सुमारे २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शक्तीसिंह प्रकाशसिंह तोमर (वय ४१) हे १० एप्रिलच्या रात्री कुटुंबीयांसह घराच्या हॉलमध्ये झोपले होते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे…

Read More

लग्न मिरवणुकीत डीजेवरून वाद; १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव :- तालुक्यातील जयपूर लांडे येथे लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान डीजेवरील गाण्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान लग्नाची मिरवणूक सुरू असताना डीजेवरील गाण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन…

Read More

किरकोळ वादातून काका-भाच्यावर सळईने हल्ला; तिघांवर गुन्हा, घाटपुरी येथील घटना!

खामगाव :- येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घाटपुरी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणासह त्याच्या काकावर लोखंडी सळईने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गणेश हरसिंग सोळंके (वय ३३) यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. त्यांच्या भाच्याने शेजारील…

Read More

कारच्या धडकेत ऑटो उलटून; दुचाकी चिरडली, सुदैवाने जीवितहानी टळली

खामगाव : शहरातील टिळक पुतळा परिसरात सायंकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटो उलटून जवळून जाणारी दुचाकी ऑटोखाली चिरडली गेल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेने काही काळ परिसरात खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या…

Read More
error: Content is protected !!