जागेच्या वादातून हाणामारी; तिघांवर गुन्हा दाखल, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील कंझारा येथे जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, परस्परविरोधी तक्रारींवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की २९ जानेवारी रोजी संतोष फकीरा शेगोकार यांनी प्रभाकर पंढरी शेगोकार यांना घराच्या बांधकामासंदर्भात विचारणा केली असता वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत…

Read More

विष प्राशन करून 24 वर्षीय तरुणाने संपवली जीवन यात्रा, खामगाव येथील घटना!

  खामगाव :- स्थानिक शंकर नगर भागात २१ जानेवारीच्या रात्री २४ वर्षीय अभय सुनील सोनोने यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेचा उलगडा दुसऱ्या दिवशी सकाळी झाला, तेव्हा कुटुंबियांनी तातडीने त्यांना सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके…

Read More

झोपलेल्या इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन व पैसे लंपास.. तिघांवर गुन्हा दाखल; खामगाव शहरातील घटना

  खामगाव :- येथील बाळापुर नाका परिसरातील अजय हॉटेलसमोर १७ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरीचा प्रकार घडला. निलेश वसंतराव गव्हाळ (४१, रा. जगदंबा रोड) हे रात्री १२.३० वाजता बाजीवर झोपले होते. मध्यरात्री १.३० वाजता जाग आल्यावर त्यांना त्यांच्या गळ्यातील ५२ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, ५० हजार रुपये रोख व मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. चोरीचा…

Read More

तोल गेल्याने विहिरीत पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव, दि. १४ (प्रतिनिधी) – खामगाव तालुक्यातील ढोरगाव येथे १३ जानेवारी रोजी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत पवन विलास टिकार (वय २५) या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पवन हा सायंकाळी घरासमोरील विहिरीवर गेला होता. दरम्यान, अचानक तोल गेल्याने तो थेट विहिरीत पडला. ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी धाव घेतली आणि तात्काळ मदतकार्य सुरू…

Read More

नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरला, खामगाव येथील घटना!

  खामगाव, दि. १४ (प्रतिनिधी) – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजीचा उत्साह चांगलाच वाढला आहे. मात्र, यासोबतच घातक नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेकांना गंभीर दुखापती होत असून खामगाव शहरात याचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे.भुसावळ चौक येथे १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दुचाकीस्वार शेख करीम यांच्या गळ्याला नायलॉन…

Read More

अवैध दारू वाहतुक करणाऱ्यावर खामगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई; 54000 रुपयांचा मुद्देमाल जप्त!

खामगाव : देशी आणि विदेशी दारूची अवैध वाहतूक करून विक्री करण्यासाठी जात असलेल्या आरोपीला खामगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी रात्री दहा वाजता पारखेड फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जलंब येथील प्रवीण हरीचंद्र रोठे (वय २२) याच्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी त्याच्याकडे देशी दारूच्या ३०० बाटल्या, विदेशी दारू व बियरच्या…

Read More

खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याची वरिष्ठांशी गैरवर्तणूक; पोलीस अधीक्षकांनी केले कर्मचाऱ्याचे निलंबन!

  खामगाव :- खामगाव शहर पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याला वरिष्ठांशी असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. गजानन बोरसे, हे खामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी असून, त्यांच्याविरुद्ध वर्तणुकीबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात आली होती. त्यांच्या असभ्य वर्तणुकीमुळे वरिष्ठांशी संबंध बिघडल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्राथमिक चौकशीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी…

Read More

दिव्यांग अल्पवयीन मुलावर अत्याचार; दोघे आरोपी जेरबंद, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव :- तालुक्यात एका गावात अल्पवयीन दिव्यांग मुलावर दोघांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी स्वप्नील गवारगुरु (२९) आणि आशिष शिंदे (३५) यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केले. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

डोक्यावर कर्ज, पुढे मुलीचे लग्न, या चिंतेतून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; खामगाव तालुक्यातील घटना

  खामगाव (प्रतिनिधी): मुलीच्या लग्नाच्या खर्चाची व कर्जाच्या भाराची चिंता सहन न झाल्याने अंत्रज येथील शेतकरी सहदेव किसन कोकाटे (वय ५१) यांनी २८ डिसेंबर रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही साखळी अद्याप थांबलेली नाही. अनुदानासाठी जाचक अटींमुळे…

Read More

पुलावरून लक्झरी बस कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही, बाळापूर-पारस फाट्यावरील भिकुनखेड पुलावरील घटना!

  खामगाव : अकोला जिल्ह्यात बाळापूर-पारस फाटादरम्यान असलेल्या भिकुनखेड पुलावरून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता खासगी लक्झरी बस खाली कोसळली. या बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.अयोध्येहून दर्शन घेऊन परतणारी लक्झरी बस (क्रमांक एमएच ३७ बी ४९९९) भुसावळमार्गे वाशिमकडे जात होती. भिकुनखेड पुलावर कठडे नसल्यामुळे बस थेट नदीपात्रात कोसळली. घटनेची माहिती…

Read More
error: Content is protected !!