विध्यार्थी व शिक्षकांच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना; अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत नको ते करायचा! आरोपी शिक्षक उगले भरणार पापाची फळे
दुसरबीडः वर्गातील अल्पवयीन मुलींचा वारंवार विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुध्द किनगावराजा पोलिसानी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली आहे. वर्दही, ता. सिंदखेडराजा येथील जिल्हा परिषद शाळेत खुशालराव उगले नावाच्या शिक्षकाचा विनयभंग करण्याचा हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरु असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. २१ ऑगस्ट रोजी शाळेतील इयत्ता चौथीतील एका विद्यार्थिनीचा शिक्षक खुशालराव…
