समृद्धी महामार्गावर डुलकीमुळे अपघात; चालक थोडक्यात बचावला
मलकापूर पांग्रा :- परिसरातील समृद्धी महामार्गावर गुरुवारी सकाळी पिकअप वाहनाचा अपघात घडला. चालकाला प्रवासादरम्यान आलेल्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून ते डिव्हायडरवर आदळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २९०.२०० येथे हा प्रकार घडला. पुसद (जि. यवतमाळ) येथून नाशिककडे जाणाऱ्या…
