महावितरणच्या निष्काळजीपणामुळे उमलते आयुष्य संपले; विजेच्या धक्क्याने आर्मीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू
जळगाव जामोद : खेर्डा खुर्द येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे आणखी एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (२६ जून) दुपारी घडली. शेतात पेरणीचे काम सुरू असताना विजेच्या खांबावरील ताणाच्या संपर्कात आल्याने २० वर्षीय संकेत प्रभाकर वेरुळकर याचा जागीच मृत्यू झाला. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या या तरुणाच्या अकाली निधनाने संपूर्ण…
