Headlines

पुराच्या पाण्यात तीन म्हशींचा बळी; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान, अचानक आलेल्या महापुराने संसाराचा आधार हिरावला; मडाखेड खुर्द येथील शेतकरी हवालदिल

जळगाव जामोद : डोळ्यांसमोर पाण्याचा लोंढा वाढत गेला आणि काही कळायच्या आत गोठ्यातील जनावरे पुराच्या पाण्यात अडकली. जीव वाचविण्यासाठी धावपळ सुरू असतानाच तीन म्हशी पाण्यात बुडाल्या. या दुर्दैवी घटनेत शेतकरी अशोक रामेश्वर बाराहाते यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पुराच्या पाण्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा आधारच हिरावून घेतला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड…

Read More

दुकानातील गर्दीचा फायदा घेत पिशवी लंपास; ९० हजारांची रोकड, ८ चेकबुक गायब

जळगाव जामोद : शहरातील बालाजी मंदिर परिसरातील बालाजी ट्रेडिंग दुकानात चोरट्याने हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली हिरव्या रंगाची पिशवी अज्ञात व्यक्तीने लंपास केली. या पिशवीत ९० हजार रुपयांची रोकड आणि चार बँकांची आठ चेकबुक होती. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धान्य व्यापारी हरीदास माणिकराम माटे (वय…

Read More

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव जामोद : माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहित महिलेचा पतीसह नातेवाईकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची तक्रार जळगाव जामोद पोलिसांत दाखल झाली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल मोहल्ला, बहादूरपुरा, जिल्हा बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे ही घटना घडली. तक्रारदार महिलेने पती तसेच त्याच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी करून…

Read More

नदीत पाय घसरून पडल्याने ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

जळगाव जामोद : शहरातील गैरान (महासिद्ध महाराज नदी) परिसरात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. नदीकाठी शौचासाठी गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. सिद्धार्थ नगर येथील रहिवासी महादेव जागजव वागोदे (वय ५५) हे नदीकाठी गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या…

Read More

तीन वर्षांपूर्वीची मंदिर चोरी उघडकीस; चांदीचा मुकुट जप्त

जळगाव जामोद : पोलिसांच्या तपासातील बारकाव्यांमुळे तीन वर्षांपूर्वी पिंपळगाव काळे येथील बिरोबा मंदिरातून चोरीला गेलेल्या चांदीच्या मुकुटाचा अखेर शोध लागला आहे. दुसऱ्या मंदिर चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या संशयिताची चौकशी केली असता त्याने बिरोबा मंदिरातील चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १८० ग्रॅम वजनाचा आणि १ लाख ३६ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट जप्त केला….

Read More

महाकालेश्वर संस्थानच्या पाणीपुरवठा योजनेवर चोरट्यांचा डल्ला; विहिरीतील मोटार लंपास

जळगाव जामोद : तालुक्यातील जामोद येथील श्री महाकालेश्वर संस्थानच्या पाणीपुरवठा योजनेतील विहिरीत बसविण्यात आलेली मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री महाकालेश्वर संस्थानने सन २०२३ मध्ये भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विहिरीत मोटार बसविली…

Read More

दुचाकीच्या पॉकेटमधून ३५ हजारांचा ऐवज लंपास एसबीआय शाखेसमोरची घटना; ३० हजारांची रोकड, मोबाईल व कागदपत्रे चोरीला

जळगाव जामोद : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेसमोर उभी असलेल्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीवरील पॉकेटमध्ये ठेवलेली ३० हजार रुपयांची रोकड, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे ३५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना सोमवारी (२१ जुलै) दुपारी घडली. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, जळगांव जामोद तालुक्यातील घटना!

जळगाव जामोद : तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील भटक्या-विमुक्त जाती-जमातींसाठीच्या सरस्वती निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे आश्रमशाळा परिसरात शोककळा पसरली आहे. मोहित अनिल वाकुडकर (वय ११, रा. धानोरा महासिद्ध) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. काही दिवसांपूर्वीच त्याने आश्रमशाळेत प्रवेश…

Read More

जळगाव जामोदमध्ये मध्यरात्री जुगार अड्ड्यावर धाड; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव जामोद :- गुप्त माहितीच्या आधारे जळगाव जामोद पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या धाडीत ‘एक्का-बादशाह’ जुगाराचा डाव उधळून लावत पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ८० हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल व ५२ ताश पत्ते जप्त करण्यात आले असून, अंधाराचा फायदा घेत पसार झालेल्या ७ ते ८ जणांचा पोलीस शोध घेत आहेत. जळगाव जामोद ते बऱ्हाणपूर रोडलगत असलेल्या…

Read More

रस्त्यावरील गिट्टी ठरली जीवघेणी; अपूर्ण महामार्गाच्या कामामुळे ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

जळगाव जामोद :- जळगाव जामोद-वारी हनुमान महामार्गावरील अपूर्ण काम आणि रस्त्यावर साचलेल्या गिट्टीमुळे आणखी एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला. जामोद येथील ६५ वर्षीय दुर्गाबाई मुरलीधर जोशी यांचा दुचाकी घसरून झालेल्या गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More
error: Content is protected !!