Headlines

vidharbh

महिना उलटला तरी मलकापूर तालुक्यातील भाडगणी गावात पिण्याचे पाणी नाही, नागरिकांमध्ये तीव्र संताप!

मलकापूर( उमेश इटणारे ): तालुक्यातील भाडगणी गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, महिना उलटूनही या समस्येवर तोडगा न लागल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाडगणी गावात तीनशे ते चारशे घरं असून, गावातील लोकसंख्या चार ते पाच हजारांच्या आसपास आहे. या गावात अनेक शेतकरी असून, शेतातील कामांसाठी आवश्यक असलेले पाणीही उपलब्ध नाही….

Read More

मलकापूरमध्ये भाजपात शेकडो तरुणांचा जोरदार प्रवेश; मा. आमदार संचेती यांच्या नेतृत्वाखाली महाविजयाचा संकल्प

मलकापूर: भारतीय जनता पक्षात सामील होण्यासाठी मलकापूरच्या तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शहर उपाध्यक्ष डॉ. विजयजी डागा यांच्या प्रयत्नांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. सुभाष तलरेजा, नरेंद्र कोलते, हरीश भावनांनी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, तर बूथ क्रमांक 176 चे अध्यक्ष व भाजपा प्रदेश निमंत्रित कार्यकारिणी सदस्य डॉ. योगेशजी पटणी यांच्या अथक प्रयत्नांमुळे शेकडो तरुणांनी पक्षात प्रवेश…

Read More

माजी आमदार चैनसुख संचेती यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिनशर्त पाठिंबा: नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विश्वास, शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान अपेक्षित

  मलकापूर ( उमेश इटणारे ): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदुरा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन माजी आमदार चैनसुख संचेती यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी प्रश्नांच्या समाधानासाठी संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या पाठिंब्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संघटनेने जारी केलेल्या निवेदनावर तालुक्यातील…

Read More

प्रेमविवाहानंतर पती-पत्नीमध्ये वाद; सासरच्या नातेवाईकांकडून मारहाण, परस्पर तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

खामगाव : प्रेमविवाहानंतर पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादात समेट घडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला सासरच्या दोन नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारीनुसार, जयरामगड येथील श्याम रामभाऊ जाधव (६०) यांच्या मुलाचा विहिगाव (ता. खामगाव) येथील आदिनाथ व अनिल वाडेकर यांच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी श्याम…

Read More

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव :- तालुक्यातील निपाणा येथे ३० वर्षीय महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, १० नोव्हेंबर रोजी ती तिच्या आईला दवाखान्यातून घरी घेऊन जात असताना बुध्दविहारासमोर तिच्या भावासोबत बोलत असताना गावातील गजानन अजाबराव अंभोरे आणि कैलास आत्माराम गावंडे यांनी गैरवर्तन केले. तसेच…

Read More

खासदार बळवंत वानखेडे यांचे वादग्रस्त वक्तव्य, इतिहासाचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही संघर्ष करू – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

मलकापूर: अमरावतीचे विद्यमान खासदार बळवंत वानखेडे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडकिल्ल्यांवर मशीद झाली पाहिजे,असे वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ मलकापूर शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.श्री ओम शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाचे प्रमुख, यावेळी बोलत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘डाव्या विचारसरणीचे आणि जिहादी शक्तींचे…

Read More

कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजूर महिलांचा ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन अपघात, १३ जण जखमी; मलकापूर तालुक्यातील घटना!

मलकापूर:- काल 11 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मलकापूर तालुक्यातील ग्राम विवरा शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजूर महिलांना घेऊन जात असलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. या अपघातात एकूण १३ शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्राम झोडगा येथील शेतमजूर महिलांची एक गट विवरा…

Read More

वाघजाळ फाट्यावर नाकाबंदी दरम्यान पकडली १ कोटीची रोख रक्कम! कोणाचे होते पैसे..

बुलढाणा : बुलढाणा-मलकापूर मार्गावरील वाघजाळ फाट्याजवळ सोमवारी (११ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एक संशयास्पद एरिटीका कार थांबविली. तपास केला असता कारमध्ये सुमारे एक कोटी रुपयांची रोख रक्कम पोत्यामध्ये भरून वाहून नेली जात असल्याचे आढळले. पोलिसांनी संशयावरून सखोल चौकशी केल्यावर, ही रक्कम बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची असल्याचे स्पष्ट झाले. सदर रक्कम बँकेच्या अधिकृत…

Read More

मुलीचे आणि आईचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढले; 20 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल!

खामगाव (सुटाळा बु.): घराशेजारी राहणाऱ्या एका २० वर्षीय युवकाने विकृत मानसिकतेने दोन महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या युवकाने टिनपत्राच्या फटीतून मोबाईलचा वापर करून एका तरुणीचे आणि तिच्या आईचे आंघोळ व लघुशंका करतानाचे व्हिडीओ काढले. या बाबत सविस्तर वृत्त असे की, १० नोव्हेंबर रोजी तरुणी स्नानगृहात आंघोळ करत असताना, तिला मोबाईलचा…

Read More

मॅटराइज सर्वेनुसार महाराष्ट्रात महायुतीला विजयी मिळण्याची शक्यता, महाविकास आघाडीला धक्का

  महाराष्ट्र मॅटराइज सर्व्हे : महाराष्ट्राच्या 288 विधानसभा जागांसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होणार असून, निकाल 23 नोव्हेंबरला लागतील. त्याआधीच, मॅटराइज सर्व्हेने राज्यात कोणाचे राज्य असणार याचे अंदाज वर्तवले आहेत. या सर्व्हेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले असून, महाविकास आघाडी आणि महायुती यांचे धाबे दणाणले आहेत. सर्व्हे 10 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आला असून,…

Read More
error: Content is protected !!