कोलते महाविद्यालयाच्या विद्युत विभागाच्या औद्योगिक भेटीने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला
मलकापूर : पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्युत विभागाने औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव व व्यावहारिक ज्ञान मिळवून देण्यासाठी मोताळा येथील ओ२ सायक्लिक एनर्जी पॉवर प्रा. लि. या १०० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला भेट दिली. ऊर्जा निर्मिती, प्रसारण व वितरण या विषयावर आधारित या औद्योगिक भेटीत एकूण ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या भेटीचा मुख्य…
