Headlines

vidharbh

काँग्रेसने दिलेली पाणीपुरवठ्याची आश्वासनं हवेतच विरली, मलकापूर वासीयांची पाणीटंचाई कायम!

  ( उमेश ईटणारे ) मलकापूर :- काँग्रेस पक्षाने मलकापूर शहरातील पाणी समस्येवर दिलेल्या आश्वासनांना सत्तेवर येऊनही काही साधता आलं नाही. आमदार राजेश एकडे आणि माजी नगराध्यक्ष हरिश रावळ यांनी पाच पाण्याच्या टाक्यांचा वायफळ वादा करून मलकापूरकरांना फसवलं आहे. “पाच पाणी टाक्या उभारून शहराला नियमित पाणीपुरवठा करणार” असं आश्वासन दिलं, परंतु पाच वर्षांचा काळ उलटूनही…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात जपानी भाषा आणि संस्कृतीवर वेबिनार संपन्न

  मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या परकीय भाषा सेलतर्फे ७ नोव्हेंबर २०२४ रोजी “जपानी भाषा आणि संस्कृतीचे रहस्य उलगडा” या विषयावर विशेष वेबिनार आयोजित करण्यात आला. या वेबिनारमध्ये हायटेक जपान आणि मिराई बिझनेस सोल्यूशन्स, जपानमध्ये कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित कॉर्पोरेट प्रशिक्षक श्रीमती नंदिनी तांबोलकर यांनी विद्यार्थ्यांना जपानी भाषा आणि संस्कृतीविषयी मार्गदर्शन केले….

Read More

गळफास घेऊन 35 वर्षीय शेतमजुराने संपवली जीवनयात्रा, जळगाव जामोद तालुक्यातील घटना!

जळगाव जामोद : तालुक्यातील खेर्डा बु. गावात एक ३५ वर्षीय विवाहित शेतमजूराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद ऊर्फ परमेश्वर समाधान वानखडे यांनी त्यांच्या राहत्या घरात छताच्या लोखंडी पाइपला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. त्यांचा भाऊ पवन समाधान वानखडे यांनी याबाबतची फिर्याद जळगाव जामोद…

Read More

नाकाबंदी दरम्यान अवैध गुटखा व वाहनासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त!

खामगाव : गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी एका वाहनासह ९ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना, नितीन मधुकर इंगळे (वय ३८, रा. शिरसगाव निळे, ता. शेगाव) याने एमएच-२८-एबी-७४५ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून शासनाने प्रतिबंधित व मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या गुटख्याची…

Read More

विदर्भ लाईव्हने भूमिपूजनाचे चालवलेले भाग तंतोतंत खरे.. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच विद्यमान आमदारांकडून मलकापूर – नांदुरा मतदार संघात भूमिपूजन, रावळ यांनी ही केला होता आरोप!

  ( उमेश ईटणारे ) मलकापूर: निवडणुकीच्या तोंडावर मलकापूर मतदारसंघात भूमीपूजनाचा एक नवा गाजावाजा करण्यात आला, पण यामागे निवडणुकीसाठी फक्त दिखाव्या बाजूने काम सुरू असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस पक्षातून बंडखोरी केल्यानंतर अँड रावळ यांनी केलेल्या आरोपांमध्ये ५ वर्षांत जो विकास झाला, तो नगण्यच असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हाट्सएपवरून आणि सोशल मीडियावर मतदारांची याबद्दल नाराजी…

Read More

निवडणूक आयोगाने अडत व्यापाऱ्याचे चार लाख रुपये जप्त केले; शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग जाम केला

( उमेश ईटणारे ) मलकापूर :- निवडणूक आयोगाने एका अडत व्यापाऱ्याचे चार लाख रुपये जप्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग जाम केला. बाजार समितीतील शेतकऱ्यांना देण्यासाठी अडत व्यापारी बँकेतून पैसे काढून आणत होता. मात्र, महामार्गावर जात असताना निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून पैसे जप्त केले.सदर अडत व्यापाऱ्याने सर्व आवश्यक पुरावे दिले तरीही निवडणूक…

Read More

बुलढाण्यात स्कुटी वाहन चालकांकडून वीस लाख रुपयांची रोकड जप्त!

बुलढाणा :- शहरातील कारंजा चौकामध्ये एका जणाकडून २० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाकाबंदीदरम्यान बुलडाणा शहर पोलिसांनी एका स्कुटी चालकाची तपासणी केली. त्याच्याकडे २० लाख मोठी रक्कम मिळून आली. स्कुटी चालक आणि रोख रक्कम बुलडाणा पोलिसांनी ताब्यात घेतले. पकडल्या गेलेल्या व्यक्तीचे…

Read More

सिलेंडरच्या स्फोटात चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक, १० जण गंभीर जखमी!

वृतसंस्था जळगाव :- शहरातील इच्छादेवी चौकात चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस भरत असताना सिलिंडरचा स्फोट झाला.या स्फोटात चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक झाली. तर १० जण गंभीर जखमी झाले. शहरातील इच्छादेवी चौकातील एमआयडीसी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये चारचाकी वाहनात घरगुती गॅस भरत असताना अचानकपणे सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. वाहनाजवळ उभे…

Read More

मलकापूर विधानसभा : रावळ आणि आ. एकडे मध्ये आरोप – प्रत्यारोप अन् रावळांचा अर्ज मागे; काँग्रेसची अंतर्गत कलह आणि बंडखोरीचे राजकीय नाट्य

मलकापूर:- ( उमेश इटणारे ) विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरले आहेत. काँग्रेसने विद्यमान आमदार राजेश एकडे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने माजी नगराध्यक्ष एडवोकेट हरीश रावळ यांनी या निर्णयाविरुद्ध बंडखोरीचा निर्णय घेत, अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली. काँग्रेस पक्षात तिकीटाबद्दल सुरुवातीपासूनच चर्चा असतानाच, हरीश रावळ यांचं नाव उमेदवारीसाठी प्रखरपणे चर्चेत होतं. तथापि, २०१९…

Read More

रेल्वे अपघातात अनोळखी पुरुषाचा मृत्यू: मलकापूर पोलिसांचे ओळख पटवण्यासाठी आवाहन

मलकापूर: खामखेड परिसरातील रेल्वे रुळांवर रविवारी रात्री एका अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. लोको पायलट चालकांनी खामखेडचे उपस्टेशन अधीक्षक दुष्यंत मधुकर पिटुरकर यांना रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास याची माहिती दिली. मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रॅकमन समाधान भगवान पंडित यांनी या घटनेची नोंद केली. मृत व्यक्तीची उंची साधारण ५ फूट, सडपातळ शरीरयष्टी,…

Read More
error: Content is protected !!