शेतातील खोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; भाडगणी येथील घटना!
मोताळा :- तालुक्यातील भाडगणी शिवारात एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह शेतातील टिनपत्र्याच्या खोलीत आढळून आल्याची घटना १८ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सचिन गजानन क्षीरसागर असे मृत तरुणाचे नाव असून, तो शेतातील खोलीत लोखंडी पाइपला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळला. ही बाब सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लक्षात आली. मिळालेल्या…
