घरफोडीत १.७३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरी; डोणगावात चोरट्यांचा धुमाकूळ!
डोणगाव :- येथील खंडोबा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी ९ ते १३ एप्रिलदरम्यान घडल्याचे सांगण्यात येत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक २ मधील रहिवासी डॉ. गजानन प्रल्हादराव पातुरकर हे घराला कुलूप लावून बाहेरगावी…
