चौपाटीवर भीषण आग; आठ दुकाने जळून खाक, खामगाव-शेगाव मार्गावरील वाटिका चौकातील घटना!
शेगांव :- खामगाव-शेगाव मार्गावरील वाटिका चौकातील माने चौपाटी येथे बुधवारी सायंकाळी भीषण आग लागून आठ दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास एका खाद्यपदार्थांच्या दुकानात स्वयंपाक सुरू असताना अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने…
