बुलढाणा शहरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; १० लिटर हातभट्टी दारू जप्त
बुलढाणा : शहरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बुलढाणा शहर पोलिसांनी २६ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६:३० वाजताच्या सुमारास येळगाव परिसरात ही कारवाई केली. या वेळी आरोपी आनंद…
