Headlines

vidharbh

मलकापुरात जनआक्रोश मोर्चाने पालिका प्रशासन हलले; चार महिन्यांत पाणीप्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन!

मलकापूर :- शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नाने संतप्त झालेल्या नागरिकांचा संयम अखेर संपला असून, सोमवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून नगर परिषद कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. “आम्हाला पाणी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. शहरातील विविध भागांत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे…

Read More

घरात एकटाच असताना टोकाचे पाऊल; केला नगरात युवकाची आत्महत्या

खामगाव:- सिव्हिल लाईन परिसरातील केला नगर येथे एका ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल बाळकृष्ण कराळे (वय ३२) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी रात्री त्याने घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास…

Read More

दारूच्या नशेत संताप अनावर; कुऱ्हाडीच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

खामगाव :- दारू पिण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद क्षणार्धात हिंसक वळणावर जात एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील वाडी येथे घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खामगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता भास्कर जवंजाळ (वय ३७, रा. जुनी वाडी, खामगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून…

Read More

35 हजारांच्या बदल्यात ₹3.50 लाख देण्याचे आमिष; बनावट नोटांच्या बंडलासह दोघे जेरबंद; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- कमी पैशांत जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना मलकापूर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने सापळा रचून अटक केली. या कारवाईत बनावट नोटांचे बंडल, दुचाकी व मोबाईल फोनसह एकूण 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हैदराबाद येथील दोन इसमांना 35 हजार रुपयांच्या…

Read More

जागतिक पातळीवर मलकापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: प्राचार्य डॉ. प्रशांत के. देशमुख जगातील अव्वल ५% शास्त्रज्ञांच्या यादीत मानांकित!

मलकापूर :- .अकोला जिल्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी व सध्या मलकापूर येथील इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, बुलढाणा संचलित, डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रशांत के. देशमुख (Dr. Prashant K. Deshmukh) यांना प्रतिष्ठित ‘साय-रँक ग्लोबल रजिस्ट्री २०२५’ (SciRank Global Registry 2025) द्वारे जगातील अव्वल ५% शास्त्रज्ञांमध्ये (Top 5% Scientist) स्थान मिळवून एक ऐतिहासिक बहुमान…

Read More

सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणातील आरोपी शेगाव रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

शेगाव : नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणाचा छडा लावत शेगाव लोहमार्ग पोलिसांनी संशयित आरोपीला मलकापूर येथे ताब्यात घेत चोरीतील दागिने व रोख रक्कम जप्त केली. रेल्वे पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे आरोपीला अटक करण्यात यश आले असून प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८७/२०२६ अंतर्गत भारतीय…

Read More

देऊळगावमही येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

देऊळगावराजा :- अन्न व औषध प्रशासन विभागाने देऊळगावमही येथे धडक कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे (वय 25, अन्न व औषध प्रशासन,…

Read More

तीन चिमुकल्यांसह आई बेपत्ता; कुटुंबीयांची चिंता वाढली

खामगाव : शहरातील चांदमारी फुकटपुरा परिसरातून एका महिलेसह तिची तीन अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोणालाही कोणतीही माहिती न देता घरातून निघून गेलेल्या चौघांचा अद्यापही शोध लागलेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. पोलिसांनी हरवल्याची नोंद घेत शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदमारी फुकटपुरा येथील…

Read More

भरधाव दुझचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

मोताळा :- तरोडा-शिरवा मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरोडा येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृत युवकाचे नाव धनराज जोरसिंग मस्से (रा. तरोडा, ता. मोताळा) असे आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ रमेश जोरसिंग मस्से…

Read More

ऑनलाईन आखीव पत्रिकांतील त्रुटींवर मनसे आक्रमक; ७ दिवसांत दुरुस्तीची मागणी

मलकापूर : शहरातील ऑनलाईन आखीव पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) संगणकीकरण प्रक्रियेत झालेल्या गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला निवेदन देत संबंधित त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सात दिवसांत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला…

Read More
error: Content is protected !!