Headlines

vidharbh

शेतात जाण्याच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा

नांदुरा : शेतात ये-जा करण्याच्या मार्गाच्या वादातून एका शेतकऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर सारंगधर बोंबटकर (वय ५५, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव) यांची गट क्रमांक…

Read More

फसव्या कर्जमाफीविरोधातील आंदोलन शेतकऱ्यांच्या अंगलट; १४ जणांवर गुन्हा

मलकापूर : राज्य शासनाच्या कर्जमाफी धोरणाविरोधात आंदोलन करत स्वतःच्या शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या जाळून निषेध व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांवर अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असून शासनाविरोधातील आंदोलन आता अधिक चर्चेचा विषय ठरले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत १८ जून रोजी वाघुळ शिवारातील काही…

Read More

लोखंडी रॉडने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा, नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा : तालुक्यातील नायगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. एका व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, १८ जून रोजी रात्री नायगाव येथे फिर्यादी संतोष प्रल्हाद सपकाळ (वय ३२) यांच्याशी आरोपींनी वाद घातला. यावेळी महेंद्र देविदास सपकाळ याने दारूच्या नशेत लोखंडी…

Read More

हॉटेलमध्ये पायाने मैदा तुडवल्याचा व्हिडिओ व्हायरल; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

जानेफळ : नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार जानेफळ येथे उघडकीस आला आहे. हॉटेलमध्ये समोसा, कचोरी व अन्य नाश्ता पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा एका कामगाराकडून पायाने तुडवला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित हॉटेल व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे. जानेफळ येथील बसस्थानक…

Read More

खामगाव पोलिसांची गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई; १४ जनावरांची सुटका, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव :- गोवंश जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करून त्यांची तस्करी करणाऱ्यांविरोधात खामगाव शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी धडक कारवाई केली. टॉवर चौक परिसरात नाकाबंदी दरम्यान तीन संशयित वाहने पकडून १४ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे २२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस…

Read More

चारित्र्यावर संशयातून वाद; तरुणाला घरात घुसून मारहाण, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : चारित्र्यावर संशय घेत झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीच्या घटनेत झाल्याने मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका तरुणाला घरात घुसून काठी व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत चार जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख अकरम शेख साबीर (वय २४, रा. मिल्लत नगर, भालेगाव रोड,…

Read More

तालसवाड्यात दिवसाढवळ्या घरफोडी; १.४० लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास

मलकापूर : तालुक्यातील तालसवाडा येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

Read More

साखरखेर्ड्यात गुटखा माफियांवर धडक; १८ लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त

सिंदखेडराजा : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीविरोधात अखेर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत साखरखेर्डा येथे तब्बल १८ लाख ९ हजार ८१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून कारवाईदरम्यान दोन्ही संशयित आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे. १७…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर कोलोरी शिवारातील गव्हाण फाट्यानजीक बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार वाहनाचा शोध सुरू केला आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय दादाराव वानखडे (वय ३५, रा….

Read More

पीएच.डी. पदवीने विज्ञान महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. पूनम इंगळे यांचे शैक्षणिक यश

मलकापूर :- विज्ञान महाविद्यालय, मलकापूर येथील संगणकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सौ. पूनम महेश इंगळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामार्फत संगणकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेत भर पडली आहे. डॉ. इंगळे यांनी संगणकशास्त्र विषयात सखोल संशोधन करून ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली….

Read More
error: Content is protected !!