मलकापुरात डासांचा कहर वाढला; नागरिक त्रस्त, धूर फवारणीची जोरदार मागणी!
मलकापूर :- शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील गल्लोगल्ली डासांचे प्रमाण वाढल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिकेकडून डास नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः धूर फवारणी होत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे….
