शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास; ५८ वर्षीय इसमाची आत्महत्या, मलकापूर तालुक्यातील घटना!
मलकापूर : तालुक्यातील वडोदा येथील ५८ वर्षीय इसमाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २३ जून रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडोदा येथील रहिवासी अरुण रामचंद्र मुंढे (वय ५८) यांनी गावालगतच्या शिवारातील गट क्रमांक ४४९ मधील…
