संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला तांदुळवाडी येथे परसबाग प्रोत्साहन व ग्रामस्वच्छता अभियान उत्साहात

मलकापूर :- दि. २५ नोव्हेंबर : संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला एवोनिथ स्टील अंतर्गत दिलासा संस्थेच्या माध्यमातून तांदुळवाडी येथे विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील महिलांना परसबाग निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी परसबाग किटचे वाटप करण्यात आले. तसेच परसबागेचे महत्त्व व त्यातून मिळणारे फायदे याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर गाव परिसरात ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सामूहिक ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य तसेच संस्थेच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन गाव परिसराची स्वच्छता केली. यावेळी “स्वच्छतेमध्ये सहभाग; स्वच्छ भारत, विकसित भारत” हा संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या उपक्रमात एवोनिथ स्टील व दिलासा संस्थेचे कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, उमेद गटाच्या सदस्यांसह महिला मंडळाच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला.

ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण, परसबाग निर्मितीला प्रोत्साहन देणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि लोकसहभागातून ग्रामविकासाला चालना देणे, या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून ग्रामस्थांनी सामूहिक सहभागातून गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *