Headlines

अनुराबाद येथे एवोनिथ स्टीलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; २८० नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

    • अनुराबाद (ता. मलकापूर) : सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत एवोनिथ स्टील यांच्या वतीने अनुराबाद येथील मराठी शाळेत दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

      या आरोग्य शिबिरात अनुराबाद, पान्हेरा, तांदुळवाडी, हरसोडा आणि धोंगर्डी येथील तब्बल २८० नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तातील साखर (Sugar), रक्तदाब (BP), थायरॉईड, डोळ्यांची तपासणी, कॅन्सर तपासणी तसेच हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनही यावेळी देण्यात आले.

      कार्यक्रमाला पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सी. जे. ढवक तसेच महिला बचत गट समन्वयक मंगेश हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

      एवोनिथ स्टीलच्या CSR टीममधील अंकितजी पोतदार, अमिताजी चौरसिया, प्रफुल्ल भोपळे आणि कुणाल भातखेडे यांनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच दिलासा संस्थेचे सुजल धस, अमोल साखरकर, नरेश बाजरे, श्रीमती प्रियंका फिरके आणि संजय बोराडे यांचेही सहकार्य लाभले.

      आरोग्य तपासणीसाठी नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कैलास डाखोरे, डॉ. सुविधा डिक्कर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रतीक्षा देशमुख, तसेच झोडगा उपकेंद्राच्या डॉ. कल्पना भगत, श्रीमती सी. पी. चव्हाण आणि सविता पाटील यांनी सेवा दिली. यासोबतच आशा सेविका सविता पारस्कार आणि श्रीमती अर्चना आव्हाळ यांनीही शिबिरात सहभाग घेतला.

      नांदुरा नेत्रालयाचे डॉ. विश्वकर्मा वेलकर व त्यांच्या टीमने नागरिकांची डोळ्यांची तपासणी केली. तसेच ममता संस्थेच्या श्रीमती रश्मी होले, श्रीमती सुरेखा जंगले आणि विश्वजित बुजाडे यांनी शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले. यावेळी अनुराबाद येथील शिक्षकवृंद व अंगणवाडी सेविकांची उपस्थितीही होती.

      ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच विविध आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे नागरिकांनी स्वागत केले. वेळेवर आरोग्य तपासणी आणि आजारांचे प्राथमिक निदान होण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले.

      हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी अनुराबाद ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, एवोनिथ स्टील कंपनीचे सर्व प्रतिनिधी तसेच दिलासा व ममता संस्थेच्या सर्व प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागात अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!