मलकापूर :- सेवा संकल्प अभियान व ‘नमो सेवा गाथा’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, भालेगाव रण येथील विद्यार्थ्यांनी ‘जागर शासकीय योजनांचा, विकास जनसामान्यांचा’ या विषयावरील पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण केले. २ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या आवारात तसेच तहसील चौकात विद्यार्थ्यांनी मनोरंजक पद्धतीने विविध शासकीय योजनांची माहिती देत जनजागृती केली.
पथनाट्यातून केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा, याबाबतही जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सजगाने मॅडम, गटशिक्षणाधिकारी श्री. खराडे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. फाळके, श्री. शिंदे तसेच सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले. पथनाट्याच्या तयारीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चौधरी, कु. क्षीरसागर, श्री. वाडसे सर आणि वर्गशिक्षिका खोटाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षण विभाग, मलकापूर यांच्यावतीने सहभागी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.