Headlines

पायाच्या ऑपरेशनदरम्यान ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू; मलकापूर शहर पोलिसांत मर्ग दाखल

मलकापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या ४५ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी मलकापूर येथे घडली. या प्रकरणी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या मेमोवरून मलकापूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल करून नोंद केली आहे.
वरखेड, ता. मलकापूर येथील विनोद दगडू सुशीर (वय ४५) यांना पायाचे ऑपरेशन करण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास डॉ. चेतन जाधव देशमुख यांच्या आयुष्मान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ऑपरेशनची प्रक्रिया सुरू असताना उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत डॉ. चेतन जाधव, आयुष्मान हॉस्पिटल यांच्या वतीने कक्षसेवक तेजस भोनाजी मोरे (रा. झोडगा) यांनी मलकापूर शहर पोलिसांना माहिती दिली. या मेमोच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!