मलकापुर:-: तालुक्यातील हरणखेड येथील सुरेश रमेश चोपडे यांच्या गट नंबर 106 शिवारातील चार एकरातील भरीत वांग्याच्या पिकावर श्रीकर कंपनीचे प्राईम प्रावर हे ग्रोथ प्रमोटर औषधाची दि.18 ऑगस्ट 26 रोजी फवारणी केली थोड्याच वेळात वांग्याची झाडे – झाडांची पाने वाळू लागले आणि वांग्याची झाडे पूर्ण करपली त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबतची तक्रार सुरेश रमेश चोपडे रा.हरणखेड यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.सुरेश चोपडे यांनी नुकसान भरपाई ची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.