Headlines

कॉलेजमध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म देण्यासाठी गेलेली २० वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : शिष्यवृत्तीचा फॉर्म जमा करण्यासाठी कॉलेजमध्ये गेलेली २० वर्षीय तरुणी घरी परतलीच नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. मैत्रिणी, नातेवाईकांसह विविध ठिकाणी शोध घेऊनही तिचा थांगपत्ता न लागल्याने अखेर वडिलांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष रामचंद्र पालवे (वय ५०, रा. सावरगाव जहागीर, ता. मोताळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची २० वर्षीय मुलगी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मलकापूर येथील वाजता गोळे कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीचा फॉर्म जमा करण्यासाठी गेली होती. फॉर्म जमा करून कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर ती घरी परतलीच नाही. मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिच्या मैत्रिणी, नातेवाईक तसेच इतर संभाव्य ठिकाणी शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. अखेर मुलीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची तक्रार वडिलांनी पोलिसांत दिली. या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अप. क्र. ८८८/२०२६, कलम १४०(३) बीएनएसनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *