लोणवडीतील १८ वर्षीय युवती बेपत्ता; मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंगची नोंद

मलकापूर : तालुक्यातील लोणवडी येथील १८ वर्षीय युवती घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. कुटुंबीयांनी घरासह शेजारी व गाव परिसरात शोध घेऊनही ती आढळून न आल्याने मलकापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे.
शारदा बाबुराव सुरडकर, रा. लोणवडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता त्या नेहमीप्रमाणे घरकामासाठी उठल्या असता त्यांची मोठी मुलगी कु. वैष्णवी बाबुराव सुरडकर (वय १८) घरात दिसून आली नाही. यानंतर पतीसह घरात, शेजारी तसेच गाव परिसरात तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेही आढळून आली नाही. बेपत्ता वैष्णवी हिने पांढऱ्या रंगाचा, हिरव्या रंगाच्या रेषा असलेला टॉप, काळ्या रंगाची सलवार व कथ्थई रंगाच्या रबरी सँडल परिधान केले आहेत. तिच्या गळ्यात काळ्या रंगाच्या धाग्यात रुद्राक्ष आहे. रंग सावळा असून उंची सुमारे पाच फूट आहे.
या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मिसिंग क्रमांक १८/२०२६ नुसार नोंद केली असून पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता मोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!