Headlines

पैशाच्या वादातून तरुणावर चाकूने वार; अकोल्याला उपचारासाठी हलविले

जळगाव जामोद : तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. वादातून एका तरुणाच्या पोटावर चाकूने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

पिंपळगाव काळे येथील अनिल बालीकराम उर्फ बाळू भगेवार (वय अंदाजे २८) याचा पैशाच्या कारणावरून फिर्यादी सरला ओंकार बावस्कर (वय ४०) यांच्या दिरासोबत वाद झाला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर चाकूने पोटावर वार करण्यात आल्याने संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर जळगाव जामोद पोलिसांनी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून प्रकरण क्र. ५१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ३५२ व ३५१ (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास मपोउपनि. स्नेहा शेडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!