Headlines

गोव्यात कु. ज्योती श्रीराम मांडवेकर यांचा सन्मान; साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल

पणजी (गोवा) : गोमंतकातील ज्येष्ठ कवी स्व. उदय वसंत ताम्हणकर यांच्या निवडक कवितांवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या ‘खुली कविता सादरीकरण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बुलढाणा जिल्ह्यातील उदयोन्मुख कवयित्री व साहित्यिक कु. ज्योती श्रीराम मांडवेकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सोहळा शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ३ वाजता पणजी (गोवा) येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
साहिल प्रकाशन गोवा व दुर्गा प्रकाशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कु. ज्योती मांडवेकर या मराठी साहित्य क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करत असून कविता लेखन, विविध साहित्यप्रकारांतील लेखन, प्रभावी कविता सादरीकरण आणि साहित्य संवर्धनासाठी त्यांची विशेष ओळख आहे. सामाजिक, भावनिक, प्रेरणादायी तसेच मानवी मूल्यांना अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या कविता आणि साहित्यकृतींना वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या प्रभावी सादरीकरण शैलीमुळे त्यांनी साहित्यप्रेमींच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना आजपर्यंत राज्यस्तरीय तसेच राष्ट्रस्तरीय अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विविध साहित्य संमेलने, काव्यस्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या सादरीकरणातून विशेष छाप पाडली असून त्यांच्या साहित्यकृतींचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. गोव्यातील या प्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी त्यांची निवड झाल्याने बुलढाणा जिल्ह्यासह साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध साहित्यिक, कवी, सामाजिक संस्था, मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. कु. ज्योती श्रीराम मांडवेकर यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात अभिमानाची भावना व्यक्त होत असून त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!