मलकापूर (प्रतिनिधी): स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, गायत्री परिवार मलकापूर आणि जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २१ जून २०२६ रोजी सकाळी ४.४५ ते ६.३० या वेळेत जनता कला व वाणिज्य महाविद्यालय येथे योग दिन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी लोकसेवा शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अरविंदजी कोलते, मा. बंडूभाऊ चौधरी, प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, नूतन विद्यालयाचे पाचपांडे सर, मा. हरिभाऊ पाटील, योग गुरु भरत शहा आणि सौ. प्रणाली खर्चे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी गायत्री परिवाराच्या वतीने उपस्थितांना योगाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच विविध योगासने व प्राणायामांचा सामूहिक सराव करून घेण्यात आला. यानंतर सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांच्या हस्ते मुख्य योगगुरू अविनाश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साही स्वागत करण्यात आले, तसेच त्यांचे सहकारी अथर्व संबारे, दर्शन टावरी, वेदांगी पाटील व नव्या जावळे यांचाही महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी योगगुरू अविनाश पाटील यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले अनन्यसाधारण महत्त्व सविस्तरपणे विशद केले व उपस्थित सर्वांकडून विविध योगासने आणि प्राणायामांची प्रात्यक्षिके करून घेतली, ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले, प्रा. कैलास कोळी, प्रा. मंजिरी करांडे, प्रा. भाग्यश्री नारखेडे, प्रा. ख्याती चौधरी, प्रा. स्नेहल पवार, प्रा. शुभांगी निवाने, प्रा. शीतल इंगळे, प्रा. आचल गोळे, प्रा. श्रद्धा लांडे, प्रा. इतणारे, प्रा. पूनम पठ्ठे व प्रा. चेताली नारखेडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी संचालन व आभार प्रदर्शन तेजस हिंगे यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध विभागांमध्ये व परिसरातील इतर विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा मोलाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.