डोणगाव :- तालुक्यातील उमरा देशमुख येथे सुरू असलेल्या शेतजमिनीच्या न्यायालयीन वादातून एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गिरीधर डोळस (वय ४०, रा. उमरा देशमुख) हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्या शेतालगत राहणाऱ्या नातेवाईकांशी जमिनीच्या कारणावरून न्यायालयात वाद सुरू आहे. २४ मे रोजी दुपारी संतोष डोळस हे शेतात गेले असता, आरोपींनी जुन्या वादाचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्याशी वाद घातला. यावेळी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवरून देविदास उत्तमराव डोळस, मनोहर देविदास डोळस, गजानन देविदास डोळस आणि शुभम राजेश डोळस (सर्व रा. उमरा देशमुख) यांच्याविरुद्ध डोणगाव पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.